आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील ४० टक्के जनता तणावाखाली; मुख्यमंत्र्यांची दिल्लीत माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शेतकऱ्यांची मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी करण्याचा कोणताही आदेश सरकारने काढलेला नाही, असे स्पष्ट करून राज्यात ४० टक्के लोक तणावाखाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या समुपदेशनावर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले, चव्हाण बातम्यांवर प्रतिक्रिया देतात, त्यामुळे अडचणीत येतात. शेतकरी आत्महत्यांची कारणे शोधतानाच तज्ज्ञांमार्फत समुपदेशन करून नकारात्मकता दूर करण्याचा मूळ विषय होता. मात्र शेतकऱ्यांना वेड्यात काढले जाण्याचा आरोप होत असेल, तर हे टीका करणाऱ्यांचे दुर्दैव आहे. एका सर्वेक्षणानुसार ४० टक्के लोक तणावाखाली असून त्यांना बाहेर काढायचे तर तज्ज्ञ नेमावे लागतील. काही ठिकाणी हा प्रयोग सुरू आहे .

विस्तार दिवाळीनंतर : बिहारच्या निवडणुकांनंतर म्हणजेच दिवाळीनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता फडणवीस यांनी बोलून दाखवली. मुंबई पालिकेत भाजप-शिवसेना युती राहणार असल्याचेही ते म्हणाले.