आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अम्मांना हृदयविकाराचा तीव्र झटका, प्रकृती गंभीर, चेन्नईत अपोलो रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुमारे अडीच महिन्यांपासून अपोलो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रविवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्या अत्यवस्थ असून त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, तामिळनाडूत सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला असून अपोलो रुग्णालयाच्या परिसरात चाहत्यांची गर्दी वाढू लागल्याने या भागाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

राज्यपाल तातडीने चेन्नईकडे : तामिळनाडूच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव विशेष विमानाने चेन्नईला रवाना झाले. गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही राज्यपालांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तामिळनाडूचे सर्व मंत्री, मुख्य सचिव व विविध विभागांचे सचिव तातडीने चेन्नईत दाखल झाले आहेत.

पोलिस सतर्क : चेन्नईमध्ये जयललितांच्या प्रकृतीवरून निर्माण होत असलेला तणाव पाहता राज्य राखीव पोलिस दल, राज्य पोलिस यांच्यासह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

रुग्णालयाचे प्रसिद्धिपत्रक : अपोलो रुग्णालयाचे सीओओ सबय्या विश्वनाथन यांनी रविवारी सायंकाळी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे जयललितांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे सांगून तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असल्याचे स्पष्ट केले.

दुपारी सर्व काही ठीक होते : २२ सप्टेंबर रोजी प्रचंड ताप व विषाणुसंसर्गामुळे जयललितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर रविवारी दुपारी एम्सच्या डॉक्टरांनी जयललितांच्या तब्येतीची पाहणी करून लवकरच त्या घरी जाऊ शकतील, असे म्हटले हाेते. मात्र, सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली.
बातम्या आणखी आहेत...