आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल यांच्‍या घराचे वीजबील तब्‍बल 1 लाख 35 हजार रूपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्‍या शासकीय निवासस्‍थानाचे जून महिन्‍यातील
वीजबील पाहिले तर 'शॉक' लागेल. सिव्‍हील लाईन परिसरातील 6 फ्लॅग स्‍टाफ रोड वरील
त्‍यांच्‍या शासकीय निवासस्थानाचे वीजबील तब्‍बल एक लाख 35 हजार रूपये आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार त्‍यांच्‍या सीएम निवासामध्‍ये 30 पेक्षा अधिक एसी आहेत. मात्र या पैकी किती खासगी क्‍वार्टरमध्‍ये आहे हे स्‍पष्‍ट नाही. एप्रिल-मे या महिन्‍यातही त्‍यांच्‍या सरकारी घराचे वीजबील 91 हजार रूपये असल्‍याने विरोधकांनी त्‍यांना कात्रीत पकडले होते.

हे पहा मीटरनुसार किती वापरली विज
सीएम निवासात लावण्‍यात आलेले दोनही मीटर डोमे‍स्टि‍क कॅटेगीरीमध्‍ये येतात. त्‍यापैकी एकाचे
बील (सीए नंबर 60019133598) 113598.86 रूपये आहे, तर दुसरे मीटर (सीए नंबर
60019133564) बील 22689.56 रूपये आले आहे. यापैकी एका मीटरव्‍दारे 11637, तर
दुसऱया मीटरव्‍दारे 2510 यूनीट एवढी वीज वापरण्‍यात आली असल्‍याची माहिती आहे. मात्र
यापैकी सरकारी आणि खासगी कामासाठी किती वीज वापरली हे स्‍पष्‍ट नाही.

ऑफीसचेही मीटर आहे डोमेस्टिक
या प्रकरणाबाबत टाटा पावर सीएम निवासला एक नोटीस बजावणार आहे, की जे मीटर
शासकीय कामकाजासाठी आहे त्‍याला डोमेस्टिक कॅटेगीरी नसायला हवी, तर शासकीय कामे,
पक्ष कार्यकर्त्‍यांच्‍या बैठका, जनता दरबार व अन्‍य संबंधित कामासाठी या मीटरचा वापर व्‍हायला
हवा. दोनही मीटर घरगुती कामासाठी वापरण्‍यात येतील असे आवेदनात सांगण्‍यात आले होते.
केजरीवाल यांचे दुसरे मीटर कमर्शियल करण्‍यात आले, तर विजबीलही दुपटीने वाढणार आहे;
कारण डोमेस्‍ट‍िक पेक्षा कमर्शियर विजदर अधिक आहेत.

शासन काय म्‍हणते
सीएमच्‍या घराचे विजबील कमी आहे आणि दुसरे मीटर शासकीय कामकाजासाठी बसवण्‍यात
आले आहे. यामध्‍ये पक्ष आणि जनता दरबारच्‍या बैठका होतात. विजजोडणी डोमेस्टिक असेल, तर कमर्शियल करण्‍याचे प्रशासनाला सांगण्‍यात येईल, अशी प्रतिक्रीया एका शासनाच्‍या प्रवक्‍त्‍याने दिली आहे.

एक नजर केजरीवाल यांच्‍या बंगल्‍यावर
अरविंद केजरीवाल यांच्‍या सिव्‍हील लाईनमध्‍ये असलेल्‍या घरामध्‍ये चार बेडरूम, एक गेस्‍ट रूम,
दोन ऑफिस आणि एक लॉन आहे. लॉनसाठी असलेली जागाही एवढी मोठी आहे की, सुमारे
तीनशे लोक तेथे बसू शकतात.