आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत आम आदमी पार्टीच्या 6 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. केजरीवाल यांनी साध्या राहणीमानाचा संदेश दिला. ते साध्या वेशातच शपथविधीला पोहोचले. त्यांनी व्हीआयपी सुरक्षा नाकारली. तसेच गाड्यांचा ताफाही नाकारला. शपथविधीलाही ते मेट्रोनेच पोहोचले. एवढेच नव्हे तर शपथविधी झाल्यानंतर ते स्वतःच्या गाडीतूनच राजघाट आणि सचिवालयात गेले. हा साधेपणा सर्वांनाच भावला आहे.
शपथविधीला घरातून निघाल्यानंतर त्यांनी मेट्रो स्थानकावर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे तिकीट घेतले. त्यानंतर ते वैशाली मेट्रोस्थानकावरुन मेट्रोमध्ये चढले. दिल्ली मेट्रोने त्यांच्या सुरक्षेसाठीही कडक बंदोबस्त् ठेवला होता. एक रिकामी मेट्रो सोडण्यात आली होती.
केजरीवाल नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता उठले. त्यांनी अर्धा तास योगसाधना केली. त्यानंतर पूजा केली. सकाळी ते उद्यानात फेरफटका मारतात. परंतु, त्यांनी आजच्या दिवशी हे टाळले. प्रसारमाध्यमे तसेच आपच्या कार्यकर्त्यांची घराबाहेर गर्दी होती.
केजरीवाल यांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही होते. हा जल्लोष पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.