आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Kejriwal Promises Are Not Fulfilled In 48 Hours, Then Support Will Return

बिन्नीचे केजरीवाल सरकारला अल्टिमेटम, 48 तासांत आश्वासन पूर्ण करा, नाहीतर 'आप'ला खिंडार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये आणखी एक भर पडली आहे. 'आप'मधून बडतर्फ करण्यात आलेले आमदार विनोदकुमार बिन्नी, जेडीयूतून राजीनामा दिलेले आमदार शोएब इक्बाल आणि आमदार रामवीर शौकीन यांनी केजरीवाल सरकारला पुढील 48 तासांमध्ये 'आप'ने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सांगितले आहे. या तीनही आमदारांनी जर केजरीवाल सरकारने या आश्वासनांची पूर्तता केली नाही तर 'आप' पक्षाला दिलेले समर्थन काढून घेऊ अशी धमकी दिली आहे.