आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार ‘सबसे तेज’ १ हजार मोहल्ला क्लिनिक बांधू; केजरींची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम आदमी पार्टीचे सरकार ‘सबसे तेज’ असून पुढील वर्षी राजधानीत १ हजार मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यात येतील, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. देशातील नियोजित वेळेत रुग्णालये व शाळा उभारण्याचे काम राज्य सरकारने केल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला.

दिल्लीजवळील रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेजचे उद््घाटन अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते रविवारी झाले. त्याप्रसंगी त्यांनी विक्रमी वेळेत बांधकाम पूर्ण केल्याचे सांगितले. ते म्हणाले, कशाला सर्वात वेगवान म्हणावे, हे बहुदा टीव्ही वाहिन्यांना ठाऊक नसावे. परंतु दिल्ली सरकार मात्र जनतेच्या कामात ‘सबसे तेज’ आहे एवढे नक्की. वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत केवळ एक वर्षात बांधून तयार करण्यात आली आहे.आपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर १०० मोहल्ला क्लिनिक सुरू झाले. वास्तविक गेल्या ६० वर्षांतही त्यांची एवढी संख्या नव्हती. आता आगामी सहा महिन्यात १ हजार दवाखाने सुरू केले जाणार आहेत. त्याचा लाभ दिल्लीकरांना होणार आहे. पूर्वी दिल्लीत कल्याणकारी योजनांना भ्रष्टाचाराची कीड लागे. त्यातून विकास कामे होत नव्हती. आता मात्र विक्रमी वेळेत गुणवत्तापूर्ण कामे केली जात आहेत, असा दावा त्यांनी केला.

२०० शाळांचे बांधकाम, गिनीज बुकात नोंद हवी
राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेशी तडजोड केली नाही. त्यासाठी शैक्षणिक सुविधा पुरवण्यावरही भर दिला आहे. म्हणूनच गरीब घटकातील विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने वर्षभरात २०० शाळांचे बांधकाम पूर्ण केले आहे. कल्याणकारी योजनांत सार्वजनिक इमारतींच्या बांधकामांचा हा विक्रम आहे. त्याची गिनीज बुकमध्ये नोंद व्हायला हवी.
बातम्या आणखी आहेत...