आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड काँग्रेसमध्ये बंडखोरी, दोन नेते निलंबित; सोनियांना भेटणार रावत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत - Divya Marathi
उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत
डेहरादून / नवी दिल्ली - उत्तराखंडमध्ये काही काँग्रेस आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री हरीश रावत दिल्लीत दाखल झाले आहेत. ते सोनिया आणि राहुल गांधींची भेट घेणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे 9 बंडखोर भाजप आमदारांसोबत आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. दरम्यान, पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपात काँग्रेसचे साकेत बहुगुणा आणि अनिल गुप्ता यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. साकेत माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणांचे चिरंजीव आहेत. गुप्ता काँग्रेसचे सचिव होते.

काँग्रेस आमदारांना नैनीतालची सफर
- ज्या आमदारांचा रावत यांना विरोध होता ते सर्व विजय बहुगुणांच्या गटात सहभागी झाले असल्याची माहिती आहे.
- बहुगुणांबद्दल बोलले जाते की ते जुलैमध्ये रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेसाठी उत्सूक आहेत.
- दरम्यान, बंडखोरीचा सामना करत असलेले मुख्यमंत्री रावत यांनी घोडेबाजारीपासून दूर राहाण्यासाठी काँग्रेस आणि पीडीएफ आमदारांना नैनीतालला पाठवले आहे.
पुढील स्लाइडमध्ये, रावत यांच्यासोबत बंडखोरी करणारे आमदार
बातम्या आणखी आहेत...