आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेत सुषमा करणार स्वतःचा बचाव, वसुंधरा-शिवराजसिंह यांच्यासाठी पक्ष येणार धावून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींची मदत केल्याचा आरोप असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज स्वतःचा बचाव करतील. तर, दुसरीकडे व्यापमं घोटाळ्यात अडकलेले मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ललित मोदी वादात अडकलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या पाठीमागे भाजप नेते उभे राहातील.
रविवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षेतत झालेल्या बैठकीत वसुंधरा राजेंचा बचाव कसा करायचा असा प्रश्न विचारण्यात आला होता. राजेंना त्यांच्या बाजूने उभे राहाण्यासाठी त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे आणण्यास सांगण्यात आले होते. बैठकीला वसुंधरा यांच्यासह अर्थमंत्री अरुण जेटली, सुषमा स्वराज, निर्मला सीतारमण यांच्यासह बडे नेते उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...