आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CNG Fitness Scam CM Arvind Kejriwal Planning To Take Action Against Delhi Lg Najib Jung

दिल्लीत पुन्हा \'जंग\', 100 कोटींच्या घोटाळ्यात उपराज्यपालांना घेरणार CM?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री आणि उपराज्यपाल यांच्यात पुन्हा एकदा 'जंग' सुरु होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उपराज्यपाल नजीब जंग घेरण्‍याची तयारी सुरु केली आहे. नजीब जंग यांच्या विरुद्ध दिल्लीतील 100 कोटी रुपयांच्या सीएनजी फिटनेस घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्याची केजरीवाल मागणी करणार आहे. यासाठी केजरीवाल आज आज (सोमवार) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सीएनजी फिटनेस घोटाळा 2002 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात झाला होता. उपराज्यपाल नजीब जंग यांनी त्यावेळी आपल्या पदाचा गैरवापर करून हे प्रकरण गुंडाळण्याचे आदेश दिले होते, असे सीबीआयच्या अहवालात म्हटले आहे.

2002 मध्ये उघडकीस आला होता 'सीएनजी फिटनेस घोटाळा'
सीएनजी फिटनेस घोटाळा 2002 मध्ये उघडकीस आला होता. सीएनजी वाहनांचे संचालनाची परवानगी दिल्यानंतर दिल्ली सरकारला सुमारे 100 कोटी रुपयांचा फटका बसला होता. एसीबीने याप्रकरणी चौकशी केली. परंतु, ठोस माहिती हाती येण्यापूर्वीच नजीब जंग यांनी या प्रकरणाची फाईल बंद करण्‍याची आदेश दिले होते.

दिल्लीत आता परिवर्तन झाले असून आम आदमी पक्ष (आप) सत्तेत आला आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने सीएनजी घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडली आहे.
मुख्य सचिवांकडे मागितला अहवाल
दिल्ली सरकारने मुख्य सचिवांकडे सीएनजी फिडनेस घोटाळ्याचा अहवाल मागितल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या घोटाळ्यांत आयपीसी कलम 217 आणि 218 नुसार उपराज्यपाल यांच्याविरुद्ध खटला चालवला जाऊ शकतो काय? असा सवालही दिल्ली सरकारने मुख्य सचिवांना केला आहे. या कलमांनुसार जर एखादा सरकारी अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करत असेल तर त्याला कमान दोन वर्षाचा कारावास आणि दंडाची तरतूद आहे.

उपराज्यपाल नजीब जंग यांनी या घोटाळ्याची चौकशी चुकीच्या पद्धतीने थांबवल्याचे
सीबीआयच्या अहवालात म्हटले आहे. सीबीआयने तत्कालीन मुख्य सचिव डी.एम. सपोलिया, तत्कालीन परिवहन सचिव आर.के. वर्मा आणि आयएएस अधिकारी पी.के.त्रिपाठी यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी मागितली होती. परंतु, उपराज्यपालांनी त्यास स्पष्‍ट नकार दिला होता.