आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CNN IBN CSDS News In Marathi, Poll Tracker, Lok Sabha Election

लोकसभा निवडणुकीत एनडीएला 232, तर यूपीएला 139 जागा मिळतील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुका आज झाल्यास भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी 212 ते 232 जागा जिंकण्याची शक्यता आहे. सीएनएन-आयबीएन/आयबीएन-7 सीएसडीएसच्या सर्वेक्षणानुसार काँग्रेसप्रणीत यूपीएला 119 ते 139 जागा मिळण्याची शक्यता आहे.


एकट्या भाजपला 193 ते 213 जागा, काँग्रेसला 94 ते 110 जागा मिळतील. ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस 20 ते 28 जागा जिंकून तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरेल. डाव्या पक्षांना 15 ते 23 जागा मिळतील. अण्णाद्रमुक 14 ते 20 जिंकण्यात यशस्वी ठरेल.वायएसआर काँग्रेस व समाजवादी पार्टीला अनुक्रमे 14 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे. बीजेडी, टीडीपी, द्रमुक यांना 10 ते 16 जागा मिळू शकतात.


आम आदमी पार्टीचा देशभरात गवगवा केला जात असला तरी या पक्षाला फक्त 1 ते 5 जागाच मिळतील. जदयूला मोठा फटका बसून फक्त पाचच जागा मिळण्याचा अंदाज आहे. बहुजन समाज पार्टी 8 ते 14 जागा जिंकेल. सर्व्हेनुसार, भाजपला देशभरात 33 टक्के, तर काँग्रेसला 26 टक्के मते मिळतील.