आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coal Allocation Scam: Criminal Charges Filed Against Former State Minister Rao, Navin Jindal

कोळसा घोटाळा: माजी राज्यमंत्री राव, नवीन जिंदलवर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कोळसा घोटाळाप्रकरणी सीबीआयने मंगळवारी काँग्रेसचे माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव आणि काँग्रेस खासदार नवीन जिंदल यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. जिंदल यांच्या कंपनीने राव यांच्या कंपनीत गुंतवणुकीचा बहाणा करून सव्वादोन कोटी रुपयांची लाच दिली होती, असा सीबीआयचा आरोप आहे. राव 2004 ते 08 या काळात राज्यमंत्री होते. दरम्यान, सीबीआयने राव व जिंदल यांच्याशी संबंधित प्रतिष्ठानांवर मंगळवारी छापे टाकले.


आरोप काय?
खोट्या माहितीवर जिंदल कंपन्यानी झारखंडमध्ये मिळवल्या 11 खाणी. मोबदल्यात राव यांच्या सौभाग्य मीडियात त्यांनी 2.25 कोटी गुंतवणूक केली होती.