आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कोलगेट'प्रकरणी सीबीआयकडून खासदार जिंदाल यांच्‍याविरुद्ध एफआयर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणात कॉंग्रेसला मोठा धक्‍का बसला आहे. सीबीआयने कॉंग्रेसचे खासदार नविन जिंदाल यांच्‍याविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. तसेच सीबीआयने जिंदाल स्‍टील ऍण्‍ड पॉवर यासह इतर दोन कंपन्‍यांविरुद्धही गुन्‍हे दाखल केले आहेत.

सीबीआयने आज दिल्‍ली, हैदराबाद आणि कोलकाता येथे एकूण 15 ठिकाणी छापे मारले. जिंदाल यांच्‍यासह माजी कोळसा राज्‍यमंत्री दासरी नारायण राव यांच्‍याविरुद्धही एफआयआर दाखल केली आहे. यापूर्वीही चौकशीमध्‍ये जिंदाल यांचे नाव आले होते. परंतु, त्‍यांनी सर्व आरोप फेटाळले होते.