आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा घोटाळा: राजकीय लाभार्थींची चौकशी करण्यात यावी : भाजप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोळसा खाणपट्टे घोटाळ्यात राजकीय लाभार्थींची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. देशातील सरकारी यंत्रणेवर लोकांचा विश्वास निर्माण व्हावा यासाठी ते आवश्यक असल्याचे सांगत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सीबीआय चौकशीचे भाजपने स्वागत केले आहे.

यूपीएप्रणीत आघाडी सरकारने मनमाेहनसिंग यांच्यासह राजकीय नेतृत्वाला पाठीशी घातल्याबद्दल भाजपने हल्ला चढवला असून सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली सर्व लाभार्थींची चौकशी होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या सल्ल्यानुसार सीबीआयने सिंग यांची चौकशी केल्याचे भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी सांगितले. खासगी, सरकारी आणि राजकीय क्षेत्रातील संबंधित सर्वांची नि:पक्ष चौकशी केली जावी. घोटाळ्यामागचे सूत्रधार समोर येणे आवश्यक असल्याचे राव म्हणाले.

काँग्रेस नेतृत्व-कंपन्यांचे साटेलोटे : ज्या कंपन्यांविरुद्ध खटले सुरू आहेत अशा मोजक्या कंपन्या यामध्ये अडकलेल्या नसाव्यात. त्यामुळे घोटाळ्यातील राजकीय लाभार्थींची चौकशी केली जावी. काँग्रेस नेतृत्व आणि वाटप झालेल्या कंपन्यांमध्ये साटेलोटे झाल्यामुळे घोटाळा आकारास येऊ शकला नसेल. तत्कालीन नेतृत्व आणि कंत्राट मिळालेल्या व्यक्तींमध्ये संबंध असल्याचे परिस्थितीजन्य पुरावे आहेत असे राव यांनी सांगितले.