आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा अहवाल : पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे-भाकपची मागणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कोळसा घोटाळ्याच्या अहवालात बदल केल्याप्रकरणी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी स्वत: निवेदन करून स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप)केली आहे.
रेल्वेमंंत्री पवनकुमार बन्सल आणि कायदामंत्री अश्विनीकुमार यांनी तत्काळ राजीनामे दिले असते तर खोट्या प्रतिष्ठेपायी काँग्रेसने राजीनाम्याचा विषय लांबवला. अशी टीका भाकपचे सरचिटणीस एस.सुधाकर रेड्डी यांनी केली. युपीए दोन च्या कार्यकाळात एकापाठोपाठ भ्रष्टाचार,घोटाळ्यांनी कहर केला असून गेल्या काही वर्षात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरू सात मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. तर एक पुन्हा मंत्रिमंडळात आला आहे. असे रेड्डी म्हणाले. कोळसा अहवालात फेरफार करण्यात पंतप्रधान कार्यालयाचाही हात असल्याचे सिध्द झाल्यामुळे त्याचीही चौकशी करुन पंतप्रधानांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. पंतप्रधान कार्यालय महत्वाचे असले तरीही ते कायद्यापेक्षा मोठे नाही असे रेड्डी म्हणाले.