आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coal Mining Belt Investigating 10th File Disappeared

कोळसा खाणपट्टे वाटपासंदर्भातील आणखी दहा गहाळ फायलींचा शोध सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कोळसा खाणपट्टे वाटपासंदर्भातील गहाळ 10 फायलींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलाद मंत्रालयाने कोळसा मंत्रालयाला दिली आहे. गहाळ 157 फायलींपैकी 74 फायली पोलाद मंत्रालयाकडे आहेत. सीबीआयने यातील 18 फायली मंत्रालयाकडून घेतल्या आहेत. पोलाद मंत्रालयाला 46 फायलींचा तपास लागला असून आणखी 10 फायलींचा शोध घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.


कोळसा मंत्रालयाने पोलाद मंत्रालयाला पत्र पाठवून 46 फायलींची विचारणा केली होती. 20 गहाळ फायली इंडस्ट्रियल पॉलिसी व प्रमोशन विभागाकडे असून त्याचा शोध लागत नसल्याचे कोळसा मंत्रालयाला कळवण्यात आले आहे. गहाळ फायलीचा शोध घेतला जात असल्याचे कोळसा मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले होते. सीबीआयने मागवलेल्या फायलीचा आढावा घेण्यासाठी कोळसा मंत्रालयाचे सचिव एस. के. श्रीवास्तव यांनी मंगळवारी बैठक घेतली होती. संसदेमध्ये गहाळ फायलींच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला होता. विरोधकांनी त्यासाठी कामकाजही रोखून धरले होते. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला सरकारकडून मिळालेली कागदपत्रे, फायलीची माहिती देण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाने गहाळ फायली प्रकरणात एफआयआर न दाखल केल्याबद्दल 29 ऑगस्ट रोजी सरकारला फटकारले होते. सीबीआयने मागितलेल्या फायलीची पूर्तता करण्यासही सरकारला सांगण्यात आले.