आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coal Scam: CBI Records Statement Of Bagrodia, Narayan Rao

कोळसा घोटाळा : दोन माजी मंत्र्यांची चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कोळसा घोटाळ्यात संतोष बगरोडिया आणि दासरी नारायणराव या माजी राज्यमंत्र्यांची सीबीआयने चौकशी केली आहे. त्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. या घोटाळ्यात सीबीआयने 11 गुन्हे दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

एक गुन्हा एएमआरविरुद्ध
सीबीआय सूत्रांनुसार एएमआर आयर्न अँड स्टील कंपनीविरुद्ध एक गुन्हा दाखल झाला आहे. यात काँग्रेस खासदार विजय दर्डा यांचा मुलगा आरोपी आहे. कोळसा राज्यमंत्र्यांनी 18 सप्टेंबर 2008 रोजी घेतलेल्या बैठकीस कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत दावा करण्यात आला होता की, एएमआर कंपनी जायस्वाल ग्रुपचा भागीदार नाही, उलट त्यांचेच समभाग लोकमत समूह, अभिजित इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि आयएल अँड एफएस कंपनीत आहेत.

दरम्यान, दोन्ही माजी राज्यमंत्र्यांनी कोळसा घोटाळ्यात सहभागी नसल्याचा दावा केला आहे. 2006 ते 2009 या काळात दोघे राज्यमंत्री होते. याच काळात कोळसा खाणींचे वाटप झाले होते.

5 ब्लॉकचे वाटप मान्य
एएमआर आयर्न अँड स्टील प्रायव्हेट लिमिटेडने कंपनीला पाच ब्लॉक वाटप झाल्याचे मान्य केले आहे. मात्र, याची माहिती नंतरच्या अर्जात नव्हती. याच मुद्दय़ावर सीबीआयचा आक्षेप आहे. कंपनीने नव्या व फीडबॅक अर्जात समूह किंवा सहकारी कंपन्यांना पूर्वीच वाटप झालेल्या ब्लॉकची माहिती लपवली, असा सीबीआयचा आरोप आहे. शिवाय, कंपनीच्या ‘आयएल अँड एफएस’ तसेच लोकमत समूहातील शेअर भागीदारीची माहितीही लपवल्याचा आरोप आहे.