आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coal Scam : Coal Distribution Of 41 Mines Will Be Cancell, Centre Said In Supreme Court

कोळसा घोटाळा: कोळशाच्या 41 खाणींचे वाटप रद्द होणार, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोळसा खाणवाटप घोटाळ्यात 41 कंपन्यांना निविदा न काढता करण्यात आलेले खाणवाटप रद्द करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. 1993 ते 2009 या काळात हे खाणपट्टे वाटप करण्यात आले होते. यासंबंधीचा निर्णय प्रलंबित ठेवू नये, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानेदिल्यानंतर केंद्र सरकारने कोर्टात बाजू मांडताना या खाणपट्ट्यांचे वाटप रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. सीबीआयने यासंदर्भात स्थितीदर्शक अहवाल सोमवारी कोर्टात सादर केला आहे.
या सर्व कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून परवाना रद्द का केला जाऊ नये, याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. दरम्यान, या मुद्द्यावर विचार करण्यासाठी सोमवारी मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीची बैठकही पार पडली.