आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Coal Scam Convicted Contact To Jugde Court Warning

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोळसा घोटाळ्यातील आरोपीचा जजशी संपर्क; कोर्टाचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस नेते नवीन जिंदाल यांच्याशी संबंधित कोळसा घोटाळ्यातील एका आरोपीने विशेष न्यायाधीशांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे न्यायालयाने त्याला इशारा दिला. सोमवारच्या सुनावणीत जिंदाल यांचे वकील हरिहरन यांनी याची गंभीर दखल घेतल्याचे न्यायाधीशांना सांगितले.

व्यवस्थापनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. भविष्यात या गोष्टी होणार नाहीत, याची मी हमी देतो, असे हरिहरन यांनी विशेष न्यायाधीशांना सांगितले. न्यायालयीन सूत्रांनुसार, आरोपीने विशेष न्यायाधीशांना एकापेक्षा जास्त वेळेस भेटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याचे वर्तन असेच राहिल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या प्रकरणात जिंदाल रियाल्टी प्रा. लि.चे संचालक राजीव जैन, गगन स्पोंज आयर्न प्रा. लि.चे संचालक कुमार सुनेजा अन्य आरोपी आहेत.

आरोपीचे नाव गुलदस्त्यात
सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी सर्व आरोपींच्या वकिलांना एका आरोपीने संपर्क साधल्याची घटना घडल्याचे सांगितले. या प्रकरणात ज्येष्ठ वकील बाजू मांडत असताना अशा गोष्टी घडणे अपेक्षित नाही. न्यायाधीशांनी या वेळी आरोपीचे नाव उघड केले नाही. ज्येष्ठ वकिलाने आश्वासन दिल्यानंतर तुम्हाला ही कृती रेकॉर्डवर घ्यावी वाटत असेल तर मी तसे करीन; परंतु मला हे अपेक्षित नाही. तुमच्या परस्पर अशा गोष्टी हाेत असतील तर मी काही म्हणू शकत नाही. मात्र, या गोष्टी घडायला नकोत, असे न्यायाधीशांनी वकिलांना सुनावले.

कोर्टाने विचारले, तुम्ही विद्यमान खासदार आहात?
सुनावणीदरम्यान न्यायालयाने नवीन जिंदाल यांना तुम्ही विद्यमान खासदार आहात काय, असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. सीबीआयने दाखल केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठी सुनावणी ३० जूनपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. झारखंडमधील अमरखकोंडा मुरगदनगल कोळसा खाणपट्टा वाटपातील गैरव्यवहारात जिंदल ग्रुपच्या दोन कंपन्या जिंदल स्टील आणि जीएसआयपीएल कंपन्यांवरील आरोपाशी संबंधित हे प्रकरण आहे.