आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coal Scam Court Order's To Take Manmohan Singh's Statement

कोळसा घोटाळा : क्लोझर रिपोर्ट फेटाळला, मनमोहन सिंग यांची चौकशी होणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची चौकशी होणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने त्यांचा जबाब नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने मंगळवारी कुमार मंगलम बिर्ला यांच्या हिंडाल्‍कोला खाण वाटप प्रकरणाशी संबंधित क्लोझर रिपोर्ट फेटाळला आहे. तसेच पुढची चौकशी करण्याचे आणि तत्कालीन कोळसा मंत्री म्हणजेच माजी पंतप्रधान मनमोहसन सिंग यांचा जबाब नोंदवण्याचे आदेशही दिले आहेत.

सीबीआयने या प्रकरणात दाखल केलेला क्लोझर रिपोर्ट फेटाळताना कोर्टाने आदेश दिले आहेत. तसेच या संदर्भातील अहवाल 27 जानेवारीपर्यंत कोर्टासमोर सादर करण्याचे निर्देशही सीबीआयला देण्यात आले आहेत. हिंडाल्को प्रकरण एवढ्या लवकर बंद करण्याची घाई का झाली आहे, अशी विचारणा कोर्टाने सप्टेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीत केली होती. त्यानंतर या प्रकरणी कोर्टाने सीबीआयला चांगलेच फटकारलेही होती.

सीबीआयने बिर्ला आणि पीसी पारेख यांच्या विरोधात असलेल्या प्रकरणी हा क्लोझर रिपोर्ट सादर केला होता. 2012 मध्ये समोर आलेल्या या प्रकरणात कोल ब्लॉक वाटपाची प्रक्रिया पारदर्शकपणे झाली नसल्यामुळे सरकारला 1.86 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप होता. 2005 मध्ये या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नंतर सबळ पुरावे न मिळाल्याचे कारण पुढे करत, क्लोझर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यात झालेल्या सुनावणीत कोर्टाने 1993 नंतरचे सर्व कोळसा खाण वाटप अवैध असल्याचे म्हटले होते.