आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coal Scam: MP Vijay Darda, Son And Others Chargesheeted

कोळसा खाणवाटप घोटाळा; खासदार विजय दर्डा, मुलगा देवेंद्रवर आरोपपत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कोळसा खाणपट्टे वाटप घोटाळ्यात सीबीआयने गुरुवारी दुसरे आरोपपत्र दाखल केले. यात राज्यसभेचे खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र, नागपूरची कंपनी एएमआर आयर्न अँड स्टील यांच्यासह अन्य काही जणांवर भादंविच्या कलम 120-ब (कट रचने) आणि 420 (फसवणूक) नुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.

विजय दर्डा व त्यांच्या ‘एएमआर’ कंपनीने विपर्यस्त वस्तुस्थिती मांडली आणि पात्रतेच्या निकषाअंतर्गत चुकीची माहिती सादर केल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. यापूर्वी या कंपनीचे संचालक अरविंदकुमार जायस्वाल, मनोज जायस्वाल, रमेश जायस्वाल, देवेंद्र दर्डा यांच्यासह त्यांना मदत करणार्‍या काही शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या विरोधात सीबीआयने एफआयआर नोंदवला होता. या अधिकार्‍यांची नावे मात्र सीबीआयने जाहीर केलेली नाहीत.

कमल स्पॉन्जविरुद्ध क्लोजर रिपोर्ट
कमल स्पॉन्ज स्टील अँड पॉवरविरुद्ध दाखल एफआयआरसंबंधी सीबीआयने गुरुवारी दिल्ली कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. यावर कोर्ट 2 मे रोजी सुनावणी करेल. याच प्रकरणात नवरभारत पॉवर लिमिटेडसह या कंपनीच्या दोन संचालकांविरुद्ध दाखल आरोपपत्राबाबतही सुनावणी होत आहे.

..तत्पूर्वी आणखी दोन प्रकरणांत आरोपपत्र
सन 2012 मध्ये दाखल कोळसा घोटाळ्यातील पाच प्रकरणांच्या तपासाची माहिती सीबीआय शुक्रवारी सर्वोच्च् न्यायालयात सादर करणार होती. तत्पूर्वी आणखी दोन प्रकरणांत आरोपपत्र दाखल करण्यात आले. यातील एका प्रकरणात सेंट्रल कोलियरीज कंपनीचे (नागपूर) मालक आणि शासकीय अधिकार्‍यांचा समावेश असून अधिकार्‍यांची नावे सीबीआयने जाहीर केलेली नाहीत.