आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coal Scam News In Marathi, Manmohansingh, Prime Minister, Divya Marathi

कोलगेटप्रकरण: मनमोहन सिंग यांचे सल्लागार नायर यांची सीबीआयकडून चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कोळसा खाणवाटप गैरव्यवहारप्रकरणी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सल्लागाराची केंद्रीय अन्वेषण विभागाने चौकशी केली. पंतप्रधानांचे सल्लागार असलेल्या टी.के.ए. नायर यांना सीबीआयने प्रश्नावली पाठवली होती. कोळसा मंत्रालयाने फेटाळल्यानंतरही बिर्ला उद्योग समूहाच्या हिंदाल्को कंपनीस ओडिशातील खाण वाटप झाले होते याबद्दल नायर यांना विचारणा करण्यात आली आहे.


सीबीआय पुढील आठवड्यात खाणवाटप गैरव्यवहारप्रकरणी आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयास सादर करणार आहे. तत्पूर्वी नायर यांना ही प्रश्नावली पाठवण्यात आली. त्याला नायर यांनी सविस्तर उत्तर दिले आहे. कोळसा धोरण आणि सन 2006 ते 2009 या मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात झालेल्या खाण वाटपासंदर्भात या ही प्रश्नावली होती. नायर यांनी पाठवलेल्या उत्तरांसह सीबीआय आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयास सादर करणार आहे. नायर यांच्या चौकशी पूर्वी तत्कालीन कोळसा सचिव पी.सी. पारख आणि ओडिशातील खाण वाटपप्रकरणी बिर्ला उद्योग समूहाचे कुमार मंगलम बिर्ला यांचीही चौकशी झाली आहे.


कोण आहेत नायर?
73 वर्षीय टीके ए नायर हे पंजाब केडरचे सन 1963 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मूळचे ते के रळचे रहिवासी असून त्यांनी माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणूनही काम केले आहे.


दोन पत्रांभोवती तपास केंद्रित
छाननी समितीने फेटाळल्यानंतरही बिर्लांना खाणवाटप झालेच कसे, असा सवाल असून याप्रकरणी तत्कालीन कोळसा सचिव पी.सी. पारख यांनी पंतप्रधान कार्यालयामार्फत दिलेली दोन पत्रे आणि पारख यांची कुमारमंगलम बिर्ला यांच्यासोबत झालेली भेट याभोवती चौकशी कें द्रित झाली आहे.


पंतप्रधान कार्यालयातील दोघांची चौकशी
पंतप्रधान कार्यालयातील दोन माजी अधिकारी विनी महाजन आणि आशिष गुप्ता यांची सीबीआयने यापूर्वीच चौकशी केली आहे. हे दोघेही सन 2006 ते 09 या कालावधीत पीएमओमध्ये होते. पंतप्रधान कार्यालयात विनी महाजन या संचालक, तर गुप्ता हे निगराणी अधिकारी होते. विनी महाजन पंजाब केडरच्या आयएएस अधिकारी असून सध्या पंजाबात त्या प्रधान सचिवाच्या दर्जाच्या अधिकारी आहेत, तर उत्तर प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी गुप्ता यांचीही बदली त्याच राज्यात झाली आहे.


26 मार्च रोजी कोळसा खाणवाटप प्रकरणातील पाच खटल्यांबद्दलचा अहवाल सीबीआय सर्वोच्च् न्यायालयास सादर करणार आहे.