आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोळसा घोटाळा : जिंदाल, कोडांसह ७ जणांना जामीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोळसा घोटाळ्यातील एका प्रकरणात काँग्रेस नेते तथा उद्योगपती नवीन जिंदाल, माजी कोळसा मंत्री दासरी नारायण राव, झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्यासह सात जणांना विशेष न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर कोर्टाने त्यांना सशर्त अर्ज मंजूर केला.

खटल्यातील एकूण १० आरोपींशिवाय पाच अन्य कंपन्यांचे अधिकृत प्रतिनिधीदेखील कोर्टात हजर होते. त्यात जिंदाल स्टील अँड प्रा.लि. (जेएसपीएल), जिंदाल रियाल्टी, गगन इन्फ्रा एनर्जी, सौभाग्य मीडिया, नवी दिल्ली एक्झिमच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या कंपन्यादेखील आरोपी आहेत. हे प्रकरण अमारकोंडा मुरगादंगल कोळसा खाणपट्टा वाटपाशी संबंधित आहे. सीबीआयकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार जिंदाल यांनी आपल्या समूहातील कंपन्यांसाठी अमारकोंडा मुरगादंगल खाणपट्ट्याच्या शिफारशींच्या बदल्यात झारखंडचे तत्कालीन मधू कोडा सरकारला काँग्रेसकडून समर्थनाचे आश्वासन दिले होते. कोडा काँग्रेस, आरजेडी आणि इतरांच्या पाठिंब्यावर १४ सप्टेंबर २००६ ते २३ ऑगस्ट २००८ पर्यंत झारखंडचे मुख्यमंत्री होते. काँग्रेस सरकारच्या काळातील हा घोटाळा आहे.
बातम्या आणखी आहेत...