आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coalgate Scam Mp Darda Three Others Summoned As Accused By Court

कोळसा खाण घोटाळा : विजय, देवेंद्र दर्डांना दिल्ली कोर्टाचे समन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोळसा खाणवाटप घोटाळ्यात दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी राज्यसभा खासदार विजय दर्डांसह तिघांना ‘आरोपी’ म्हणून समन्स बजावले. त्यांना 23 मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. विशेष न्यायाधीश मधू जैन यांनी विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा व नागपूरची एएमआर आयर्न अँड स्टील प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी व तिचे संचालक मनोज जैस्वाल यांना हजर राहण्याचे आदेश दिले. खोट्या कागदपत्रांद्वारे कोळसा खाणी मिळवल्याने सीबीआयने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केल आहे.एएमआर आयर्न अँड स्टील प्रा.लि.ने याचिकेत सीबीआय तपासावर कोर्टाची निगराणी ठेवण्याची विनंती केली आहे.