आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Coalgate Scam News In Marathi, CBI Director Ranjit Sinha, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोळसा घोटाळ्यामध्ये अंतिम निर्णय तूर्त नको, कोर्टाचे सीबीआयला आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोळसा घोटाळा प्रकरणातील कुठल्याही खटल्याबाबत अंतिम निर्णय घेऊ नका, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला दिला. सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांनी या घोटाळ्यातील काही आरोपींना संरक्षण दिल्याचा आरोप झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोर्टाने हा आदेश दिला.

‘घाईघाईत कोणतीही कृती करू नका. पुढील सुनावणी होईपर्यंत वाट पाहा. कुठल्याही खटल्याबाबत अंतिम निर्णय घेऊ नका,’ असे सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखालील पीठाने सीबीआयच्या अधिका-यांना बजावले. मोईन कुरेशीशी संबंधित प्राप्तिकर विभागाचा मूल्यांकन अहवाल दाखल करावा, असा आदेशही पीठाने केंद्राला दिला. तो सिन्हांना अनेकदा भेटल्याचे म्हटले जाते. सिन्हांवरील आरोपांबाबत केंद्राची भूमिका काय आहे हेही स्पष्ट करावे, असे सांगून पीठाने सुनावणी १७ ऑक्टोबरपर्यंत ढकलली.