आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Coalgate Scam News In Marathi, Cbi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोळसा खाणपट्टाप्रकरणी सीबीआयला न्यायालयाने फटकारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोळसा खाणवाटप घोटाळ्यातील एक आरोपी व एएमआर आयर्न अँड स्टीलचे संचालक मनोज जायसवाल यांचा पासपोर्ट जप्त केल्याप्रकरणी सीबीआयने स्पष्ट अहवाल दाखल केला नसल्याच्या कारणावरून विशेष न्यायाधीश सोमवारी संतप्त झाले. हा पासपोर्ट परत मिळावा म्हणून जायसवाल यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

या खाणवाटप घोटाळ्यात राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र आणि एएमआर आयर्न कंपनी आरोपी आहे. या सर्वांवर खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे.