आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजधानी एक्स्प्रेसमधील जेवणात पुन्हा झुरळ, रेल्वेचा गलथान कारभार चव्हाट्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना दिल्या जाणार्‍या जेवणात पुन्हा एकदा झुरळ आढळल्याने आयआरसीटीसीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. डिब्रूगढ़- नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाच्या जेवणात झुरळ आढळले. विशेष म्हणजे तक्रार परत घेण्यासाठी आता संबंधित प्रवाशावर केटरींग कंपनीद्वारा दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणारे सुंदर श्याम धारीवाल (रा. दिल्ली) यांनी सांगितले की, डिब्रूगढ़-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमधील कोच क्रमांक बी-8 मधून ते प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना केटरिंग स्टाफद्वारा पनीरची भाजी, डाळ, भात आणि चपाती असलेले जेवणाचे बंद पाकिट मिळाले. धारीवाल यांनी पाकिट उघडले असता डाळमध्ये झुरळ तरंगत होते. धारीवाल यांनी केटरिंग स्टाफकडे तक्रार पुस्तिका मागितली. परंतु त्याने त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा केली. धारीवाल यांनी टीटीईला भेटून झालेला प्रकार सांगितला. परंतु त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर केटरींग सुपरवायझरने धारीवाल यांना तक्रार पुस्तिका उपलब्ध करून दिली. नंतर मात्र केटरींग स्टाफतर्फे फोनवरून धारीवाल यांना धमकावले जात आहे. तक्रार परत घेतली नाही तर याचा परिणाम वाईट होईल, अशी धमकीही दिली जात आहे.

याबाबत पीडित प्रवाशी धारीवाल यांनी उत्तर रेल्वे विभागात संबंधित केटरींग कंपनीविरुद्ध तक्रार केली आहे. केटरींग कंपनीद्वारा त्यांना धमकी मिळत असल्याचे धारीवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे.

धारीवाल यांच्या तक्रारीची रेल्वे प्रशासनाचे दखल घेतली असून केटरींग कंपनीच्या धमकीला न घाबरता तक्रार परत घेऊ नये, असे आवाहन करण्‍यात आले आहे. केटरींग कंपनीद्वारा पुन्हा धकमीचा फोन आल्यास दिल्ली विभागाचे डीआरएम अनुराग सचान यांच्याशी संपर्क साधावा. संबंधित केटरिंग कंपनीवर निर्धारित करण्‍यात आलेल्या नियमांकडून कठोर कारवाई केली जाणार जाईल. तसेच गाडीस विलंब का झाला, सेकंड एसीचे तिकिट असताना धारीवाल यांना वाराणसी रेल्वे स्थानकावर योग्य सुविधा का मिळाल्या नाहीत, याबाबत चौकशी सुरु करण्यात आल्याचे उत्तर रेल्वे विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नीरज शर्मा यांनी सांगितले आहे.

दरम्यान, यापूर्वी कोलकाता राजधानी एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ निघाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने इंडियन रेल्वेज् कॅटरिंग अँड टूरिझम कॉरपोरेशनवर दंडात्मक कारवाई केली आहे. सुमारे एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय नऊ कॅटरर्सवरही रेल्वेने एकूण 11.50 लाख रुपयांचा दंड आकारला होता.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, रेल्वेमध्ये मिळते असे बंद पाकिट जेवण....
(फोटो: राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना दिल्या जाणार्‍या जेवणात निघाले झुरळ)