आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरमध्‍ये हिमस्‍खलनाचा इशारा, दिल्‍लीत दाट धुक्‍यामुळे वाहतूक विस्‍कळीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- उत्तर भारतात कडाक्‍याच्या थंडीचा प्रकोप सुरुच आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरूच असल्यामुळे किमान तापमान गोठण बिंदूच्या खाली घसरले आहे. बर्फवृष्‍टी जास्‍त झाल्‍यामुळे हिमस्‍खलन होण्‍याचा धोका निर्माण झाला आहे. त्‍यामुळे ज्या भागात हिमस्खलन होण्याची शक्यता आहे, तिथे न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. बर्फवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दुसर्‍या दिवशीही बंद ठेवण्यात आली.

नवी दिल्‍लीत दाट धुक्‍यामुळे विमान आणि रेल्‍वे वाहतूक विस्‍कळीत झाली आहे. दिल्‍लीत मंगळवारची सकाळ यंदाच्‍या हिवाळ्यातील सर्वात थंड ठरली. सकाळी तापमान 9 अंश सेल्सिअस होते. दाट धुक्‍यामुळे दिल्‍ली विमानतळावरील एक धावपट्टी बंद ठेवण्‍यात आली होती. त्‍यामुळे एक देशांतर्गत विमान रद्द करण्‍यात आले. तसेच 6 उड्डाणे विलंबाने आहेत. याशिवाय तीन आंतरराष्‍ट्रीय विमानांनाही विलंब झाला आहे.

हिमाचल प्रदेशमध्‍येही कडाक्‍याची थंडी आहे. हिमाचल प्रदेशमध्‍येही बर्फवृष्‍टी आणि पावसामुळे पारा आणखी घसरला. कमी उंचीच्‍या प्रदेशात वातावरण स्‍वच्‍छ होते. परंतु, मध्‍यम ते अधिक उंचीच्‍या ठिकाणी पारा घसरला.
श्रीनगरमध्ये रात्री 0.5 मि.मी. पाऊस झाला. यानंतर येथे किमान तापमान उणे 0.4 अंश सेल्सियसपर्यंत खाली आले. काश्मीर खोर्‍यातील बर्फवृष्टीमुळे प्रशासनाने हिमकडा कोसळण्याचा इशारा दिला आहे.

प्रसिद्ध स्की रिसोर्ट गुलर्मगमध्ये साधारण 1.25 सें.मी. बर्फवृष्टी झाली. येथील किमान तापमान आणखी 3 अंशांनी घसरून 9.6 अंश सेल्सियसवर आले. पहलगाममध्ये 20 सें.मी. बर्फवृष्टी झाली आहे. रविवारी रात्री किमान तापमान उणे 4 अंश सेल्सियस होते. राज्यात सर्वात कमी तापमान लडाखच्या लेह क्षेत्रात उणे 9 अंश सेल्सियस होते. हिमाचल प्रदेश गारठले आहे. जास्त उंचावरील क्षेत्रात तुरळक पाऊस झाला.