आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cold Wave In Most Parts Of North And Central India

दिल्लीत रेकॉर्डब्रेक थंडी; महाराष्ट्र गारठला, पारा निचांकी पातळीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर- देशाची राजधानी दिल्लीत शुक्रवारी रात्री थंडीने मागील पाच वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केला. शुक्रवारी नागरिकांनी रक्त गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव घेतला. 4.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मागील पाच वर्षातील सगळ्यात कमी तापमान आहे. राजस्थानातील माउंटआबू व अलवर तसेच मध्य प्रदेशातील अमरकंटकमध्ये शून्य तापमानाची नोंद आली.

पंजाब, हरियाणात कडाक्याची थंडी; राज्यांत धुक्याचे साम्राज्य
पंजाब आणि हरियाणात शुक्रवारी कडाक्याची थंडी पसरली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून लोक घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. सरासरीपेक्षा कितीतरी अधिक नीचांकी तापमान असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. नारनौल येथे सर्वाधिक गारठा जाणवला. करनालमध्ये तापमान उणे 2.2 अंश सेल्सियस होते. पंजाबच्या अमृतसरमध्ये 5.2, पटियाला 4.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

महाराष्ट्रात निफाडमध्ये पारा सर्वाधिक निचांकी पातळीवर...
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये यंदाच्या मोसमात पारा सर्वाधिक निचांकी पातळीवर पोहोचला आहे. निफाडचं तापमान 4.4 वर घसरले आहे.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले कमान तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा)20.6
सांताक्रुझ17.4
अलिबाग17.8
रत्नागिरी17.5
पणजी (गोवा)20.0
डहाणू15.2
अहमदनगर7.0
जळगाव8.0
महाबळेश्वर10.1
मालेगांव7.4
नाशिक5.5
सांगली15.4
सातारा11.8
सोलापूर15.3
उस्मानाबाद10.4
औरंगाबाद9.6
नांदेड7.0
अकोला7.9
अमरावती9.2
बुलढाणा10.6
ब्रह्मपुरी9.8
चंद्रपूर11.0
गोंदिया6.5
नागपूर7.1
वाशिम13.6
वर्धा8.5
यवतमाळ11.0

देशातील प्रमुख शहरांतील तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
शहरकिमानकमाल
नवी दिल्ली4.218
चंडीगड5.211
भोपाळ6.622.7
जयपूर4.424.3
इंदूर7.424.2
जोधपूर5.424.4
रांची7.123.2
रायपूर12.7
25.6
(शुक्रवारी तापमानाची घेतलेली नोंद)

पुढील स्लाइडवर पाहा, देशातील पसरलेल्या बोचर्‍या थंडीचे फोटोज...