आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर भारतात थंडीची लाट धुक्यामुळे दुर्घटना; १३ ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मीर : कडाक्याची थंडी आणि सुटीचा आनंद घेणारे पर्यटक. - Divya Marathi
काश्मीर : कडाक्याची थंडी आणि सुटीचा आनंद घेणारे पर्यटक.
नवी दिल्ली - उत्तर भारतात थंडीचा कडाका आणखीनच वाढला आहे. गारठ्यामुळे अनेक राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले असून उत्तर प्रदेशात थंडीशी संबंधित घटनांत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय राजधानीत शनिवारी तापमान बरीच घसरण झाली होती. त्यामुळे शहराच्या अनेक भागांत धुकेच धुके पसरले होते. त्यामुळे दृश्यात्मकता बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. ७०० मीटर अंतरावरील दिसणे कठीण बनले होते. उत्तर प्रदेशात धुक्यामुळे झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. इकौना भागात बस आणि जीपची टक्कर झाली होती. भाविक एका जीपने दाट धुक्यातून प्रवास करत हाेते. धुके दाट असल्यामुळे हा अपघात झाला. त्यात १२ जणांचा मृत्यू झाला. अन्य एका थंडीशी संबंधित दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू, तर १० जखमी झाले. ही घटना जौनपूर जिल्ह्यात घडली. मुझफ्फरनगर येथे नीचांकी २.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. मुरादाबाद, मेरठमध्येही तापमान कमालीचे खाली गेले होते. झाशी, अलाहाबादमध्ये मात्र किमानपेक्षा काही अंशी अधिक तापमान होते. त्यामुळे थोडा दिलासा होता.

पंजाब, हरियाणातही हुडहुडी : पंजाब, हरियाणातही थंडीमुळे हुडहुडी जाणवू लागली आहे. तापमान किमान तापमानाहून खाली गेले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काश्मीरमध्ये थंडीची लाट आहे. आगामी काही तासांत बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ४ आणि ५ जानेवारी रोजी ही हिमवृष्टी होणार आहे. श्रीनगरमध्ये शनिवारी तापमान उणे ३.८ अंश सेल्सियस होते. शुक्रवारी उणे ०.७ अंश सेल्सियस हाेते. लेहमध्ये उणे ९.२, गुलमर्ग उणे ५.८, कोकेर्नग उणे २.३ अंश सेल्सियसची नोंद झाली आहे.

सिकरमध्ये नीचांकी
राजस्थानातील सिकरमध्ये उणे ५.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. श्रीगंगानगरमध्ये उणे ६.४ अंश सेल्सियस तापमान होते. छुरू-८.१, पिलानी, जयपूर, चित्तोडगड, जैसलमेर अनुक्रमे ९.१, १०, १०.७, ११.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. चंदिगडमध्ये शुक्रवारच्या रात्री ५.८ अंश सेल्सियस तापमान होते. पंजाबमध्ये अमृतसरमध्ये सर्वाधिक थंडी (३.२) होती. तापमान घसरले होते.
बातम्या आणखी आहेत...