आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला कॅप्टनचा कर्नलवर रेपचा आरोप, \'कारवाईच्या नावाखाली चांगल्या पदावरी बदली\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर/नवी दिल्ली - लष्करात महिला कॅप्टनसोबत बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. आरोपी कर्नल विरोधात लष्कराने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर आरोपीची बदली करण्यात आली आहे. मात्र, लष्कराच्या या कारवाईविरोधात पीडितेच्या वडिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचा आरोप आहे, 'लष्कराने बलात्काराच्या आरोपीवर कारवाईच्या नावाखाली त्याची चांगल्या पदावर नियुक्ती केली आहे.'

काय आहे प्रकरण
ही घटना अलवर मिलिटरी छावणीतील आहे. येथे सिग्नल कॉर्पमध्ये तैनात एका महिला कॅप्टनने दीड महिन्यापूर्वी कमांडिंग ऑफिसरविरोधात बलात्काराची तक्रार दिली होती. यात म्हटले होते, की आरोपी बदनाम करण्याची धमकी देत आहे. या तक्रारीनंतर लष्कराने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आणि आरोपीची बदली केली.
महिला आयोगाला प्रकरणात तथ्य दिसले
लष्कराच्या सिग्नल कोरच्या मेजर जनरलने हे प्रकरण तत्काळ महिला आयोगापुढे मांडले आणि चौकशीचे आदेश दिले. महिला आयोगाने केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपात तथ्य असल्याचे आढळून आले. त्यानंतर आरोपी विरोधात कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले. त्यासोबतच त्याची बदली करण्यात आली. त्यावरुन महिला अधिकारीने पुन्हा एकदा तक्रार केली आहे.

पीडितेच्या वडिलांनी संरक्षण मंत्र्यांना लिहिले पत्र
पीडितेच्या वडिलांनी संरक्षण मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे, ' मी त्या आर्मी ऑफिसरचा पिता आहे, जिने राजपथावर प्रजासत्ताक दिनी नारी शक्तीच्या परेडमध्ये भाग घेतला होता. मात्र आज मी निराश आहे. माझ्या मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपी कमांडिग ऑफिसरला कारवाईच्या नावाखाली चांगल्या पदावर पाठवण्यात आले आहे. एवढेच नाही तर त्याने युनिट सोडताना माझ्या मुलीची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला. पण मला लष्करावर विश्वास आहे. आम्हाला नक्की न्याय मिळेल.'