आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीडी हा दस्तऐवजच, पुरावा म्हणूनही ग्राह्य, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कॉम्पॅक्ट डिस्क्स म्हणजेच सीडी हेही कायदेशीर दस्तऐवजच आहेत आणि न्यायालयीन प्रक्रियेत एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी किंवा खोडून काढण्यासाठी पक्षकारांना असे इलेक्ट्रॉनिक पुरावे सादर करण्याची परवानगी द्यावी, असा महत्त्वाचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बाललैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात समशेरसिंग वर्मा यांना त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठीची सत्यता पडताळून न पाहताच ऑडिओ संभाषणाची सीडी पुरावा म्हणून सादर करण्याची परवानगी दिली. दोन कुटुंबांतील मालमत्तेच्या वादातून आपल्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. त्यासाठी आपली पत्नी, मुलगा आणि मुलीच्या वडिलांचे टेलिफोन संभाषण रेकॉर्ड केलेली सीडी पुरावा म्हणून सादर करू देण्यास पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने नकार दिला होता.