आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Complaint File Against Kumar Vishwas For Allegedly Threatening To Newspaper Editor

कुमार विश्वास यांनी पत्रकाराला दिली जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे नेते आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास एका नव्या प्रकरणात अडकताना दिसत आहेत. एका पत्रकाराने त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

नोएडा येथील स्थानिक सायं दैनिकाचे संपादक जगत अवाना यांनी कुमार विश्वास आणि त्यांच्या पत्नीविरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याची बुधवारी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कलम 507 नूसार गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण
जगत अवाना यांच्या सायं दैनिकात कुमार विश्वास आणि आप महिला कार्यकर्ती संबंधीचे वृत्त प्रकाशित झाले होते. अवाना यांचा आरोप आहे, की हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांना वारंवार धमकीचे फोन आणि मॅसेजेस येत आहेत. त्यांना संशय आहे, की कुमार विश्वास आणि त्यांचे समर्थकांनीच त्यांना मारण्याचा कट रचला आहे.
काही दिवसांपूर्वी आप नेते कुमार विश्वास आणि आपची महिला कार्यकर्तीच्या अवैध संबंधाची माध्यमात जोरदार चर्चा होती. त्यासोबतच जगत अवाना यांचेही नाव चर्चेत आले होते. अवाना यांच्यावर आरोप होता, की त्यांनी चिथावणी दिल्यामुळेच आप कार्यकर्तीने विश्वास यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. महिला कार्यकर्तीची पत्रकार परिषद आयोजित करण्यातही अवाना यांनीच मदत केल्याचा आरोप झाला होता.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, महिलेने काय आरोप केला होता
बातम्या आणखी आहेत...