आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन रामपालवर मारहाण केल्याचा आरोप; फोटो घेतल्याने भडकला, कॅमेरा फेकला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मध्यरात्रीनंतर घडली घटना. - Divya Marathi
दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मध्यरात्रीनंतर घडली घटना.
 
नवी दिल्ली- बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालने एका छायाचित्रकाराचा कॅमेरा फेकून देत त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शोभित नामक या छायाचित्रकाराला अर्जुनने रविवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास ल्यूटियन भागातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मारहाण केली. त्यात शोभितच्या डोक्याला जखम झाली असून त्याने अर्जुनविरोधात पोलिसांत तक्रारही दिली आहे. 

अर्जुन दिल्लीच्या प्रायव्ही नाइट क्लबमध्ये डीजे प्ले करत असताना शोभित त्याचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे अर्जुनला राग आला आणि त्याने शोभितचा कॅमेरा फेकून देत त्याला मारहाण सुरू केली. दरम्यान, अर्जुनने मारहाणीचा आरोप खोटा असल्याचे ट्विट केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप गुन्हा नोंदवलेला नाही. 

मात्र, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. शोभितची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...