आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातवार जनगणना पूर्ण करा, मदत थांबवण्याचा केंद्राचा राज्य सरकारांना इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जातवार जनगणनेस उशीर होत असल्याने केंद्राने राज्यांचे चांगलेच कान उपटले आहेत. ग्रामीण भागात घरे बांधणे, सामाजिक कल्याण निवृत्तिवेतन आदींसाठी राज्यांना मिळणारे अर्थसहाय्यही थांबवण्याची तंबी केंद्राने दिली आहे. जनगणना पूर्ण करण्यासाठी १५ मार्चची मुदत आहे.

ग्रामविकास खात्याच्या अधिका-यांनुसार जात आधारित सामाजिक व आर्थिक जनगणनेचे (एसईसीसी) काम पूर्ण करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे.इंदिरा आवास योजना व राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमअंतर्गतच्या लाभार्थ्यांच्या निवडीसाठी २०१५- १६ या वर्षापासून एसईसीसीची माहिती आधारभूत मानली जाणार आहे. मात्र अनेक राज्यांनी एसईसीसी माहितीतून लाभार्थ्यांची निवड केलेली नसल्याने ते आर्थिक मदतीपासून वंचित राहण्याची भीती मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

यांना बसणार फटका
जातवार जनगणना पूर्ण न केल्यास इंदिरा आवास, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन, इंदिरा गांधी राष्ट्रीय पंगुत्व पेन्शन, राष्ट्रीय कुटुंबकल्याण व अन्नपूर्णा या योजनांच्या लाभार्थींना फटका बसण्याची शक्यता केंद्राच्या पत्रकात नमूद आहे.