आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरोडा दंगल खटला सुनावणी सहा महिन्यांमध्ये पूर्ण करा, सर्वाेच्च न्यायालयाकडून मुदतवाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वाेच्च न्यायालयाने सोमवारी गुजरातच्या २००२ मधील नरोडा दंगल प्रकरणाची सुनावणी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश कनिष्ठ न्यायालयाला दिले. गोध्रा जळीतकांडानंतरच्या नऊ जातीय दंगलींची सर्वाेच्च न्यायालय नियुक्त विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जात आहे. त्यामध्ये नरोडा दंगलीचा समावेश आहे.
सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर आणि न्या. ए.एम. खानविलकर यांच्या पीठाने अहमदाबादच्या दिवाणी व सत्र न्यायालयाला संबंधित प्रकरणाच्या सुनावणीसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ मंजूर केली. या प्रकरणात साधारण ३०० साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे असल्यामुळे मुदतवाढ आवश्यक असल्याचे न्यायमित्र हरीश साळवे, एसआयटी प्रमुख आर.के. राघवन यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद केले होते. याची न्यायालयाने दखल घेतली. न्यायालयात अन्य आठ प्रकरणांत आरोपपत्र दाखल होऊन निकालही देण्यात आला आहे. ही प्रकरणे उच्च न्यायालयात आव्हान देण्याची आहेत. कनिष्ठ न्यायालयाने सुनावणी पूर्ण करण्यासाठी मुदत निश्चित केली जावी,असे साळवे यांनी सांगितले.

एसअायटीकडून ९ प्रकरणांचा तपास : गोध्राकांडानंतर पुकारलेल्या बंददरम्यान नरोडा दंगलीत ११ अल्पसंख्याकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात ८२ जणांवर आरोप आहेत. जूनमध्ये विशेष न्यायालयाने गुलबर्ग सोसायटी दंगल प्रकरणात २४ जणांना दोषी ठरवले होते. या दंगलीत काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह ६८ जणांचा मृत्यू झाला होता. सर्वोच्च न्यायालय नियुक्त विशेष तपास पथक गुलबर्ग सोसायटीसह नऊ दंगलींचा तपास करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने २२ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ न्यायालयाला गुलबर्ग सोसायटीसह विविध प्रकरणांचा निकाल देण्याचा मार्ग मोकळा केला होता.
गोध्राकांडानंतर २००० बळी
सर्वाेच्च न्यायालयाने ५ ऑगस्ट रोजी सुनावणी पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. दंगलीची अविश्वसनीय पद्धतीने चौकशी होत असल्याचा आरोप विविध सामाजिक संघटना आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने केल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयाने नऊ प्रकरणांत देखरेख यंत्रणा स्थापन केली. गुलबर्ग सोसायटी, ओड, सरदारपुरा, नरोडा गाव, नरोडा पाटिया, माचिपीठ, तारसाली, पंदरवाडा आणि राघवपुरा या भागातील दंगलींची ही प्रकरणे आहेत. गोध्राकांडानंतर साधारण २००० लोकांचा बळी गेल्याचा अंदाज आहे.
पुढे वाचा... दाक्षिणात्य संस्थेने गाेध्र्यात रचला होता हिंदू हत्येचा कट
बातम्या आणखी आहेत...