आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CONDOM SCAM: 21 Crore Spent On 10,000 \'ghost\' Vending Machines

2जी आणि कॉमनवेल्थनंतर, जाणून घ्या काय आहे \'कंडोम SCAM\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 1 लाख 76 हजार कोटी रुपयांचा 2जी घोटाळा आणि जवळपास 80 हजार कोटींच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा उघड झाल्यानंतर कॅगने कोळसा खाण घोटाळा समोर आणला होता. युपीए सरकार या घोटाळ्यांमुळे अडचणीत सापडलेले असताना एक नवा घोटाळा समोर आला आहे. हा घोटाळाही नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ) अर्थात कॅग ने उघड केला आहे. टूजी आणि कॉमनवेल्थ गेम प्रमाणे या घोटाळ्यातील आकडे हजार कोटींच्या घरात नाहीत, मात्र 22 कोटींच्या या घोटाळ्याने केंद्र सरकारची झोप उडाली आहे.

हा घोटाळाही वेगळ्या प्रकारचा आहे. सरकारने देशभरात 22 हजार कंडोम वेंडिंग यंत्र बसवले होते. त्यासाठी 21 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यातील 10 हजार मशिन गायब आहेत तर, 1,100 यंत्र काम करत नाहीत.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कॅगच्या अहवालात काय म्हटले आहे.