आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जदयु पक्षातील वाद विकोपाला, 14 राज्यांचा पाठिंबा असल्याचा यादव गटाचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-  जनता दल युनायटेडमधील (जदयू) वाद आता विकाेपाला पोहोचला असून रविवारी या वादाने आणखी एक नवे वळण घेतले. ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्या नेतृत्वातील बंडखोर गटाने त्यांच्या अखत्यारीतील पक्ष हाच खरा जदयू असल्याचा दावा करण्याची तयारी केली आहे.
 
यादव यांच्या मते, पक्षाच्या अनेक राज्य कार्यकारिण्या आपल्यासोबत असून नितीशकुमार हे जदयूच्या बिहार कार्यकारिणीचेच अध्यक्ष आहेत. यादव यांच्या समर्थनार्थ पक्षात सध्या दोन राज्यसभा सदस्य आणि काही राष्ट्रीय पदाधिकारी आहेत. मात्र, यादव यांचे निकटवर्तीय अरुण श्रीवास्तव यांच्या मते, पक्षाच्या १४ राज्य कार्यकारिण्यांचा शरद यादव यांना पाठिंबा आहे. बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर जदयूला गृहीत धरून नितीशकुमारांनी घेतलेल्या भूमिकेवर शरद यादव यांनी टीका केली होती. त्यामुळे त्यांची नितीशकुमार यांनी यादव यांची पक्षाच्या सरचिटणीसपदावरून हकालपट्टी केली होती.  जदयू ही फक्त बिहारपुरतीच मर्यादित अाहे. त्यामुळे निर्णय मान्य नसल्यास यादव यांनी पक्ष सोडावा, असे संकेतही दिले होते.
बातम्या आणखी आहेत...