आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Confusion In Congress Over Challenge Of Narendra Modi

मोदींच्‍या आव्‍हानावरुन कॉंग्रेसमध्‍ये संभ्रम; पंतप्रधान म्‍हणतात गंभीर, गृहमंत्री निवांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पाच राज्‍यांमध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकांनंतर बहुतांश निवडणूक चाचण्‍यांमध्‍ये भारतीय जनता पक्षाची सरशी होणार असल्‍याचे अंदाज व्‍यक्त केले जात आहेत. हा नरेंद्र मोदींचा प्रभाव असल्‍याचे बोलले जात आहे. लोकसभेची सेमीफायनल म्‍हणून या निवडणुकांकडे पाहण्‍यात येत आहे. पाचपैकी दिल्‍ली आणि राजस्‍थानमध्‍ये कॉंग्रेसला फटका बसणार असल्‍याचे चित्र आहे. यामागे मोदींचा प्रभाव असल्‍याचे राजकीय तज्‍ज्ञ म्‍हणतात. कॉंग्रेसमध्‍ये मात्र यावरुन चांगलीच संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

मोदींवरुन कॉंग्रेसच्‍या भूमिकेत प्रचंड विरोधाभास दिसून येत आहे. एकीकडे कॉंग्रेसचे दोन दिग्‍गज नेते, ज्‍यात खुद्द पंतप्रधानही आहेत, मोदींचे आव्‍हान असल्‍याचे सांगतात. तर काही नेते मात्र मोदींचे कोणतेही आव्‍हान नसल्‍याचे बोलतात. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आज (शुक्रवार) नरेंद्र मोदींचे आव्‍हान असल्‍याचे सांगून ते अतिशय गांभीर्याने घेत असल्‍याचे म्‍हटले आहे.

काय म्‍हणाले पंतप्रधान आणि इतर नेते... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...