आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cong Will Not Declare Rahul As PM Candidate: Digvijay

राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करणार नाहीः दिग्विजय सिंह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्‍हणून घोषणा करण्‍यात येणार नाही, असे पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते आणि सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी स्‍पष्‍ट केले आहे. यामागे नरेंद्र मोदी यांची भीती असल्‍याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. परंतु, दिग्विजय सिंह यांनी तशी शक्‍यता फेटाळली. तसेच विद्यमान पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्‍याबाबत बोलण्‍याचे दिग्विजय सिंह यांनी टाळले.

एका मुलाखतीमध्‍ये दिग्विजय सिंह यांना कॉंग्रेसच्‍या पंतप्रधानपदाच्‍या उमेदवाराबाबत विचारले असता त्‍यांनी सांगितले की, कॉंग्रेसमध्‍ये पंतप्रधान किंवा मुख्‍यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्‍याची परंपरा नाही. नुकत्‍याच कर्नाटकामध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीतही कॉंग्रेसने मुख्‍यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्‍हता.

आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पुन्‍हा सत्ता मिळाल्‍यास डॉ. मनमोहनसिंग यांनाच पुन्‍हा पंतप्रधान केले जाईल का, या प्रश्‍नाचे उत्तर देणे त्‍यांनी टाळले. निवडणुकीनंतर डाव्‍या पक्षांसोबत पुन्‍हा हातमिळवणी करण्‍यासही कॉंग्रेस तयार असल्‍याचे संकेतही त्‍यांनी दिले. नरेंद्र मोदींमुळे निवडणुकीला जातीय स्‍वरुप प्राप्‍त होईल, अशी टीकाही त्‍यांनी केली.