आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोहर पर्रीकरांविरोधात माहिती दडवल्याची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रातील एनडीए सरकारच्या अडचणी थांबण्यास तयार नाहीत. पक्षातील महिला मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप होत असताना स्वच्छ प्रतिमा असलेले संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावरही आरोप झाले आहेत. राज्यसभा निवडणुकीच्यावेळी दाखल केलेल्या शपथपत्रात मनोहर पर्रीकर यांनी गोपनीय माहिती दडवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

यासंदर्भात काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पर्रीकर यांनी अर्ज भरताना त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याची माहिती उमेदवारी अर्जात दिली होती. त्यात सर्व प्रश्नांची उत्तरे असणे अपेेक्षित होते. पण अर्जात गुन्हेगारीविषयक दाखल प्रकरणांची माहिती देण्यात आलेली नाही.

कैलासनाथ नावाच्या व्यक्तीसह इतरांविरोधात २७ जुलै २०११ रोजी फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यात पर्रीकर यांचेही नाव होते व या प्रकरणात ते पाचव्या क्रमांकाचे आरोपी आहेत. दरम्यान या प्रकरणाबाबत पर्रीकर यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
बातम्या आणखी आहेत...