आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ललितासना'तून बाहेर या, मोदी प्रकरणावरून काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींना मदत केल्याच्या प्रकरणावरून वादात अडकलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या प्रकरणी चिमटा काढला आहे. 'पंतप्रधान मोदी कान, नाक , डोळे सर्वकाही बंद करून 'ललितासन'घेऊन बसले आहेत. त्यातून बाहेर आल्यानंतर ते खऱ्या जगात परततील आणि ललित मोदींची मदत करणाऱ्या या दोन नेत्यांच्या विरोधात कारवाई करतील अशी अपेक्षा असल्याचे रमेश पत्रकार परिषदेत म्हणाले.

पंतप्रधानांना सर्व माहिती...
या पत्रकार परिषदेत जयराम रमेश यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व माहिती आहे आणि ते या वादात सहभागीही आहेत. मोदींचा खरा चेहरा समोर येईल म्हणूनच या वादावरून पूर्ण पडदा उघडला जात नसल्याचेही रमेश म्हणाले. यावेळी काँग्रेसने नरेंद्र मोदी आणि गुजरातचे व्यावसायिक गौतम अदाणी यांच्या संबंधांवरूनही चांगलाच हल्ला चढवला. सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस करत आहे.

नेहरूही करायचे योगा-काँग्रेस
काँग्रेस नेते रमेश म्हणाले की, आम्हीही योगदिनाचे स्वागत करतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस नेते मोरारजी देसाईदेखिल योगा करत होते. त्यामुळे एखाद्या पंतप्रधानाने योगा करणे यात नाही नवीन नाही. मोदी योगाचा जो बडेजाव करत आहे, ते ठीक नसल्याचेही रमेश म्हणाले. नेहरुंचा शिर्षासन करतानाचा एक फोटोही यापूर्वी बराच व्हायरल झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...