आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Alleges Modi Government Nic Changes Information Of Nehru Family On Wiki

मोदी सरकारने नेहरुंना विकिपीडियावर ठरवले मुस्लिम, काँग्रेसचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर बुधवारी नवा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डिजिटल इंडिया सप्ताहाची सुरुवात करणार आहेत, त्याआधी काँग्रेसने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे विकिपीडियाचे पेज हॅकरच्या मदतीने हॅक करुन त्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप मोदी सरकारवर केला आहे.
पंडित जवाहरलाल नेहरु त्यांचे वडील मोतीलाल नेहरु आणि आजोबा गंगाधर यांच्यासंबंधीची माहिती मोदी सरकारने हॅकरच्या मदतीने बदलली असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. पंडित नेहरुंना विकीपिडियाच्या पेजवर मुस्लिम असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काँग्रेसने हे कृत्य सरकारच्या एनआयसी विभागाने केल्याचा ठपका ठेवला आहे.
मोदी देशाची माफी मागणार का ?
सुरजेवाला म्हणाले, की विकीपिडियावर हे कृत्य भारत सरकारला सॉफ्टवेअर पुरवठा करणाऱ्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) केले असल्याचे इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) अॅड्रेसच्या माध्यमातून लक्षात येते. सुरजेवाला म्हणाले, पंडित नेहरु देशाचे पहिले पंतप्रधान होते. सरकारला सॉफ्टवेअर पुरवठा करणाऱ्या कंपनीने त्यांचा धर्म बदलण्याचा प्रयत्न केला की नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे. सुरजेवालांनी प्रश्न उपस्थित केला, की एनआयसी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घाणेरडा अजेंडा लागू करत आहे का ? पहिल्या पंतप्रधानांचा धर्म बदलवण्याचे पातक केल्याप्रकरणी पंतप्रधान मोदी देशाची माफी मागणार का ? या प्रकरणी सरकार एफआयआर दाखल करणार का ?