आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केदारनाथमध्ये भगवान शिवसमोर खोटे बोलले मोदी, परंपरेचा अपमान केला - काँग्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसने मोदींवर खोटे बोलण्याचा आरोप लावला आहे. - Divya Marathi
काँग्रेसने मोदींवर खोटे बोलण्याचा आरोप लावला आहे.
नवी दिल्ली - पीएम नरेंद्र मोदींनी केदारनाथ दौऱ्यात भगवान शिवसमोर खोटे बोलून परंपरेचा अपमान केला असे आरोप काँग्रेसने लावले आहेत. 2013 च्या संकटानंतर केदारनाथ मंदिराच्या पुनरविकासावर मोदींनी कथितरीत्या लोकांची दिशाभूल केली. तसेच मोदींचा केदारनाथ दौरा हा गुजरात विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच करण्यात आला होता असा दावाही काँग्रेसने केला आहे. 
 
2013 मध्ये काँग्रेस सरकारने दिले होते 6000 कोटी...
>> वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींवर खोटे बोलण्याचे आरोप लावले आहेत. "इटालियन चष्मा घातलेले मोदी भगवान शिवच्या मंदिरासमोर लोकांना संबोधित करत होते, तेव्हा त्यांचा अहंकार दिसत होता. मोदींनी मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ स्टेजवरून लोकांना संबोधित करत आपली परंपरा आणि संस्कृतीचा अपमान केला."
>> सुरजेवाला पुढे म्हणाले, "मोदी भगवान शिव समोर खोटे बोलत होते. मोदी लोकांना हे सांगण्यास विसरले की, 2013 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केदारनाथच्या पुनरविकास कार्यक्रमासाठी 6 हजार कोटींचे पॅकेज दिले होते."
>> कांग्रेस प्रवक्ते आरपीएन सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे, केदारनाथच्या पुनरउत्थान आणि पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गुजरातचे (तत्कालीन) मुख्यमंत्री मोदींनी काही मदत केल्याचा रेकॉर्ड नाही. केदारनाथमध्ये भाषण देताना मोदींचा अहंकार दिसत होता हे अतिशय दुर्दैवी आहे."
 
 
काय म्हणाले होते मोदी?
- मोदींनी शुक्रवारी केदारनाथ दौरा केला होता. या ठिकाणी त्यांनी भाषण केले. यात मोदी म्हणाले, "त्यावेळी (उत्तराखंड महापूर) माझी संवेदनशीलता साहजिक होती. मी एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. दुसऱ्या राज्यात मला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता. तरीही मी स्वतःला थांबवू शकलो नाही आणि आलो होतो." 
- "मी त्यावेळी असलेल्या केंद्र सरकारकडे प्रार्थना केली होती, की तुम्ही कृपया केदारनाथच्या पुरनरबांधणीचे काम गुजरातला द्या. मी देशवासियांचे स्वप्न खरे करून दाखवतो. त्यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि अधिकारी सहमत झाले होते. मी माध्यमांमध्ये आपला संकल्प जाहीर केला."
- "टीव्हीवर बातम्या आल्या होत्या. त्यावरून दिल्लीत जणू तूफान आले होते. त्यांना (काँग्रेसच्या नेतृत्वातील केंद्र सरकार) वाटले असेल की गुजरातचा मुख्यमंत्री केदारनाथला पोहचेल. यानंतर त्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला. त्यांनी एका तासानंतरच केदारनाथचे काम गुजरातला करू देणार नाही आम्ही स्वतः करू अशी घोषणा केली."
बातम्या आणखी आहेत...