आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एनडीए पीएमआेपुरते मर्यादित, निर्णयप्रक्रिया पंगू झाल्याचा काँग्रेसचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रातील सरकार पंतप्रधान कार्यालयापुरते मर्यादित राहिले आहे, असा आरोप काँग्रेसने रविवारी केला. एनडीए सरकारला एक वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसने मोदी सरकारवरील हल्ल्यात वाढ केली आहे.

सर्व निर्णय पंतप्रधान कार्यालयातून होत असल्यामुळे निर्णय प्रक्रियाच पंगू जाली आहे. वास्तविक विरोधी पक्ष म्हणून वावरताना भाजप नेहमी मनमोहन सिंग सरकारला पॅरलिसिस झाल्याचा आरोप करत. आता मात्र गेल्या एक वर्षात लोकपाल, दक्षता आयोग, सीआयसी संबंधीचे प्रश्न रखडलेल्या अवस्थेतच आहेत. निवडणुकीपूर्वी देशात आशादायी वातावरण होते. परंतु मोदी सरकारने लोकांची निराशा केली आहे. ते जनतेला एकदा मूर्ख बनवू शकतात. वारंवार नव्हे, असे काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे. सध्या सरकार धोरणात्मक निर्णयावर बोलत आहे. परंतु वास्तवात हे निर्णय अगोदरच्या सरकारनेच घेतलेले आहेत. उदाहरणार्थ आधार कार्ड. निवडणुकीपूर्वी ही योजना बंद करून टाकू , असे भाजप म्हणत होते. आता मात्र याच योजनेच्या आधारे अनेक योजनांना जोडण्याचे काम करून पाठ थोपटून घेतली जात आहे. जनधन योजना देखील आम्हीच सुरु केली होती. नवीन सरकारने केवळ योजनेचे नाव बदलले आहे.

राफेल सौद्यातून एचएएल बाहेर का ?
फ्रान्ससोबतच्या राफेल विमान साैद्यावर शर्मा यांनी सवाल उपस्थित केला. सरकारच्या मालकीच्या हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कंपनीला यातून बाहेर का ठेवण्यात आले ? पूर्वी झालेल्या करारामध्ये एचएएलला फ्रान्सच्या कंपनीतून मिळणाऱ्या तंत्रज्ञानातून १०८ जेटची निर्मिती हाेईल.

मोदी, ममता हुकूमशहा
काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांचे हुकूमशहा असे वर्णन केले आहे. दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांमध्ये एक गुप्त समझोता झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...