आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा: काँग्रेसचे 25 खासदार निलंबित, विरोधक करणार पाच दिवस सभात्याग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पावसाळी अधिवेशनादरम्यान वारंवार गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज विरोधकांकडून रोखले जात आहे. सोमवारीही गेल्या काही दिवसापासून सुरु असलेला गोंधळ कायम होता. त्यामुळे काँग्रेसच्या 25 खासदारांना लोकसभाध्यक्षांनी पाच दिवसांसाठी निलंबित केले आहे. सभागृहात पोस्टर झळकावणे, हातांवर काळ्या फिती लावणे यामुळे स्पिकर सुमित्रा महाजन संतप्त झाल्या. त्यांनी गोंधळी सदस्यांना अनेकदा शांत राहाण्याचे आवाहान केले होते. अधिवेशनाचे अजून 11 दिवस शिल्लक आहेत. त्यापैकी पुढील पाच दिवस काँग्रेसचे 25 खासदार कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत.

दरम्यान, काँग्रेस, डाव्या पक्षांसह अनेक विरोधीपक्षांनी पुढील पाच दिवस सभात्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, समाजावादी पक्षाची भूमिका याबाबत स्पष्ट झालेली नाही. काँग्रेसने निलंबनाच्या कारवाईचा निषेध केला आहे. सरकार गुजरात पॅटर्न संसदेत राबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी केला आहे.
काँग्रेसचे लोकसभेत 44 खासदार आहेत. सोमवारी लोकसभाध्यक्षांनी 25 खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित केले आहे. यात महाराष्ट्रातील हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचाही समावेश आहे.

यांच्यावर झाली कारवाई
राजीव सातव, व्हिसेंट पाला, गौरव गोगोई, सुष्मिता देव, दीपेंद्र हुड्डा, के सुरेश, के सी वेणुगोपाल, रवनीत सिंह बिट्टू, एस पी मुद्दाहनुमे गौडा, के एच मुनियप्पा, एम के राघवन, ताम्रध्वज साहू, रंजीता रंजन, रामचंद्रन मुल्लापल्ली, बी एन चंद्रप्पा, संतोष सिंह चौधरी, अबू हसन खान चौधरी, आर ध्रुवनारायण, निनोंग ऐरिंग, सुकेंद्र रेड्डी, सुरेश कोडिकुनिल, अभिजीत मुखर्जी, व्ही व्ही नायर, सी एल रुवाला आणि डॉ. टी मेन्या.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, का झाली कारवाई? कारवाईचा अर्थ काय?