आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Change Aam Aadmi Slogan For His Election Campaign

काँग्रेसच्या घोषणेतून 'आम आदमी'ची सुट्टी, योजनांच्या टॅगलाइनही बदलल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसने लोकसभा प्रचाराच्या जाहिरातीसाठी भाजपचे घोषवाक्य चोरल्याचा आरोप झाल्यानंतर आता प्रत्येक घोषवाक्य आणि जाहिरातींवर पक्ष बारकाईने नजर ठेवून आहे. तर काँग्रेसने काही घोषवाक्यांमध्ये बदल केला आहे. 'आम आदमी' हा शब्द काँग्रेसच्या जाहिरातीतून वगळण्यात आला आहे. नव्या जाहिरातीत 'प्रत्येक हातात शक्ती, प्रत्येक हाताची प्रगती' ही नवी घोषणा देण्यात आली आहे. यापूर्वीच्या निवडणूक प्रचारात काँग्रेसच्या घोषणांमध्ये 'आम आदमी' हा शब्द प्रयोग होता.
'आम आदमी'पासून का दूर गेली काँग्रेस
काँग्रेसने आता आम आदमीवरील आपले लक्ष्य कमी करुन ते मध्यमवर्गाकडे वळविले असल्याचे मत काही राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देखील पक्षाला आगामी लोकसभा निवडणूक जिंकायची असेल तर, मध्यमवर्गाचा विश्वास संपादन करण्याची गरज व्यक्त केली आहे.
आम आदमी पार्टीने 'आम आदमी'च्या जोरावर दिल्ली विधानसभा काबीज केली आहे. त्यामुळे काँग्रेसने 'आम आदमी'चा उल्लेख केला तर ते 'आप'ची नक्कल करीत असल्याचा त्यांच्यावर आरोप होण्याची पक्षाला भीती आहे. शुक्रवारी काँग्रेसने देशभरातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातील 'मी नाही, आम्ही' घोषणा दिली होती. तेव्हा त्यांच्यावर भाजपची घोषणा चोरल्याचा आरोप झाला होता.

पुढील स्लाइडमध्ये, योजनांच्या टॅगलाइनही बदलल्या