आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Chief Sonia Gandhi\'s Speech Will Hints Party Loksabha Strategy

आक्रमक शैलीत राहुल म्हणाले, टकल्यांना हेअर कट देत आहेत विरोधीपक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूकीची रणनिती ठरविण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची (एआयसीसी) बैठक येथील तालकटोरा स्टेडियमध्ये झाली. बैठकीत राहुल गांधी यांचा सुरवातीपासून जयजयकार सुरु होता. दुपारी चार वाजता त्यांनी बैठकीला संबोधित केले. यावेळी मस्करीच्या स्वरात राहुल म्हणाले, की टकल्यांना हेअर कट देण्याचा विरोधीपक्ष प्रयत्न करीत आहेत.

काँग्रेसला 21 व्या शतकात घेऊन जायचे आहे, असे सांगत 45 मिनीटांच्या आक्रमक भाषणात राहुल गांधी यांनी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेला अनेक स्वप्ने दाखवली आहेत. प्रमुख विरोधीपक्ष भाजपचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस हा पक्ष नसून विचार असल्याचे सांगत ज्या ज्या लोकांनी हा विचार संपवण्याचा प्रयत्न केला तेच नष्ट झाल्याचे राहुल गांधी म्हणाले.
आगामी काळात कार्यकर्त्यांचा आवाज, त्यांच्या भावना पक्षात ऐकल्या जातील असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आयाराम - गयाराम यांना पक्षात यापुढे थार न देण्याचे सुतावाच करतानाच, तरुण आणि महिलांनी पक्षात यावे असे आवाहनही त्यांनी केले. निवडणुकीच्या तोंडावर दुस-या पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या लोकांना यापुढे तिकीट दिले जाणार नाही असा दावा त्यांनी केला असला तरी आगामी निवडणुकीत त्याची किती अंमलबजावणी होते हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे. पक्षातील कार्यकर्त्यांनाच उमेदवारीसाठी प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितेल. त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.

महिलांचा विशेष उल्लेख करुन राहुल गांधी यांनी राजकारणात महिलांचे प्रमाण वाढले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सध्या अनुदानित सिलिंडरची संख्या 9 असून ती 12 करावी अशी जाहिर मागणी त्यांनी पंतप्रधानांना केली आहे. यापूर्वी कलंकित नेत्यांना वाचवणारा अध्यादेश फाडून राहुल यांनी सरकारला अध्यादेश परत घेण्यास भाग पाडले होते. आता जाहीररित्या वाढीव सिलिंडरची मागणीही मान्य होईल असा कयास राजकीय विश्लेषक लावत आहेत.
राहुल गांधी आक्रमक
भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता विरोधक असा उल्लेख करुन राहुल गांधी म्हणाले, 'विरोधक इतिहास विसरले आहेत. ते इतिहासाची पुस्तके वाचत नाहीत. त्यांना कळाले पाहिजे काँग्रेस हा पक्ष नाही, तर तो एक विचार आहे. बंधुभाव आणि सन्मानची वागणूक हा काँग्रेसचा विचार आहे. या विचारांवरच या देशाचा इतिहास चालत आला आहे. सम्राट अशोकापासून, बादशाह अकबर आणि महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हा विचार आहे. ज्याने ज्याने हा विचार संपवण्याचा प्रयत्न केला आहे, तेच संपले आहेत, हा या देशाचा इतिहास आहे, या शब्दात त्यांनी भाजप आणि मोदींवर नाव न घेता टीका केली आहे.

पंतप्रधानाची निवड नवनिर्वाचित खासदार करतील
पंतप्रधानांची निवड या देशातील घटनेनुसार निवडुन आलेले खासदार करतात असा टोला विरोधकांना लगावत स्वतःच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरही त्यांनी पडदा टाकला. त्याच बरोबर पक्ष देईल ती जबाबदारी पेलण्यास तयार असल्याचे सांगायलाही ते विसरले नाही. यामुळे सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल्यास काँग्रेसचे पंतप्रधान राहुल गांधीच असतील असा विश्वास बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
राहुल गांधींच्या भाषणातील मुद्दे
महिलांची लोकसंख्या 50 ट्क्के आहे.
देशातील 50 टक्के राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री असल्या पाहिजे.
अनुदानित सिलिंडरची संख्या 9 वरुन 12 करा.
दहा वर्षांत काँग्रेसने देशाची सेवा केली आहे.
पंचायत राज बद्दल त्यांनी मणिशंकर अय्यर यांचे कौतूक केले आहे.
काँग्रेसने सर्वसामान्य माणसाला माहितीच्या अधिकारातून ताकद दिली आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, मोदींचा पंतप्रधानपदाचा दावा मणिशंकर अय्यर यांनी कसा फेटाळून लावला.