आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना 25 मेला राष्ट्रपती भवनाचे प्रांगण खोदणार का?, ओमर अब्दुल्ला यांचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / मुंबई - नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान येणार आहेत. नवाज शरीफ यांच्या दौ-यावर शिवसेनेने का चुप्पी साधली आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. तर, जम्मू - काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शिवसेना 25 मेच्या रात्री राष्ट्रपती भवनाचे प्रांगण खोदणार का? असा खोचक सवाल केला आहे.
सावंत म्हणाले, काँग्रेसच्या आंतरराष्ट्रीय धोरणावर भाजप आणि शिवसेना कायम टीका करत आली आहे. पाकिस्तानसोबत संवादच नको अशी भूमिका शिवसेना घेत आली आहे. आता पाकिस्तानचे पंतप्रधान येत असताना शिवसेना शांत का आहे, असा सवाल त्यांनी केला.

पाकिस्तानचा क्रिकेट संघ आणि पाकिस्तानी कलावंताना भारतात पाय न ठेवू देण्याची मतलबी आणि संधीसाधू भूमिका शिवसेना घेत आली असल्याचे सावंत यांनी म्हटले. आता शिवसेना काय करणार असा, सवाल त्यांनी केला.
काँग्रेस कायम द्विपक्षीय चर्चेच्या माध्यामातून प्रश्न सोडवण्याच्या बाजूची राहिली असल्याचे सांगत सावंत म्हणाले, भारत आणि पाकिस्तान यांच्यात चांगले संबंध असावे या बाजूची राहीली आहे.