नवी दिल्ली - काँग्रेसने मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये गरिबांना निवार्याचा हक्क आणि रस्ते सिग्नल फ्री बनवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय शहर भिकार्यांपासून मुक्त केले जाणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली म्हणाले, पक्षाचे सरकार स्थापन झाल्यास दिल्लीमध्ये भिकार्यांसाठी पुनर्वसन योजना राबवल्या जातील. कौशल्य विकासातून त्यांचे आयुष्य सुखकर होण्यास मदत मिळेल. याशिवाय रात्रनिवार्यांची संख्याही वाढवणार आहोत.