आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण मंत्र्यांवर फसवणूक-भ्रष्टाचाराचा FIR लपवण्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुषमा स्वराज, वसुंधरा राजे आणि स्मृती इराणी यांच्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर केंद्रातील मोदी सरकारसाठी नवीन अडचण ठरू शकतात. काँग्रेसचा आरोप आहे, की राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पर्रिकरांनी त्यांच्या विरोधात दाखल एफआयआरची माहिती लपवली होती. गोवा काँग्रेसने संरक्षण मंत्री पर्रिकरांविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा
पणजीमध्ये 27 जुलै 2011 मध्ये कैलाश नावाच्या एका व्यक्तीसह तिघांनी मनोहर पर्रिकरांविरोधात फसवणूक आणि भ्रष्टाराचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. एफआयआरमधील नऊ आरोपींमध्ये पर्रिकरांचे नाव पाचव्या क्रमांकावर होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, एफआयआरची कॉपी